Pratahkal - Marathi News Update - Free bus travel for women in Karnataka from today
बंगळुरु : आजपासून कर्नाटकमध्ये (Karnataka) महिलांसाठी मोफत बससेवा (Free bus service for women) सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्या अंतर्गत महिला आजपासून एसी आणि व्होल्वो वगळता सर्व सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने ११ जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत २० किमीपर्यंत प्रवास मोफत असेल. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महिलांना बस भाड्यात निम्मी सवलत आहे.
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा (Karnataka Legislative Assembly) निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह पाच आश्वासने दिली होती. यानंतर सिद्धरामय्या यांचं सरकार येताच त्यांनी वचनपूर्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं होतं की, या योजनेअंतर्गत महिलांना राज्यांतर्गत फक्त २० किमीपर्यंतच मोफत प्रवास करता येईल. महिलांसह तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Editorial

Editorial

Next Story