Supriya Sule
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) बारामती लोकसभा मतदरासंघाच्या (Lok Sabha Constituency) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ- मॅगेझिनचा (E-magazine) एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अव्वल ठरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी २२९ चर्चासत्रांमध्ये तब्बल ५४६ वर विचारले प्रश्न विचारले. याशिवाय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ठ खासदार म्हणून झारखंडमधील भाजपचे विद्यूत बारन महतो यांची निवड झाली आहे. त्यांनी यात ६१६ मानांकन मिळवले आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचे भाजपा खासदार सुकांता मुझुमदार यांनी स्थान मिळवलं आहे.
संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यावरून देशातील सर्वोत्कृष्ठ खासदाराची निवड केली जाते. २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, तसेच त्यांनी किती प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे त्यांची सभागृहातील उपस्थिती किती होती? या सर्वांची गोळाबेरीज करून सर्वोत्कृष्ठ खासदार निवडीची प्रक्रिया पार पाडली जाते. यात सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुण मिळवले आणि त्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.
Editorial

Editorial

Next Story