Sharad Pawar
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation of the presidentship of Nationalist) देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, अशी खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच ६ मे ऐवजी ५ मे रोजी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीतील निर्णय मला मान्य आहे, असेही ते म्हणाले. शरद पवार म्हणाले की, मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता वाटत आहे. पण मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोधच केला असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. शरद पवार पुढे म्हणाले की, १ मे १९६० रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं १ मे सोबत अतुट नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. मला ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.
सुप्रिया सुळे होणार राष्ट्रीय अध्यक्ष ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा (Resign) दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. दस्तुरखुद्द सुप्रिया सुळे यांनीच १५ दिवसांत दोन स्फोट होतील असे संकेत दिले होते. त्याचवेळी अजित पवार यांचे कथित नाराजी नाट्य सुरू होते. त्यावेळीच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे. सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष होण्यास काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत काम आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष काहीच अडचण नाही, असे भुजबळ म्हणाले.

Editorial

Editorial

Next Story