✕
मंदिरात ड्रेसकोड मग पुजाऱ्यांना ड्रेस घालायला द्या
By EditorialPublished on
कोणत्याही मंदिरात ड्रेसकोड (Dress Code) लागू करणे, हा मुर्खपणा असून काही दिवसांपूर्वी कोणत्यातरी मंदिरात हाप पँट घालून आल्यावर त्या मुलाला जाऊ दिले नाही, हा मुर्खपणा असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. मंदिरामधील बसलेले पुजारी अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली

x

नाशिक, दि. २९ (वार्ताहर) : कोणत्याही मंदिरात ड्रेसकोड (Dress Code) लागू करणे, हा मुर्खपणा असून काही दिवसांपूर्वी कोणत्यातरी मंदिरात हाप पँट घालून आल्यावर त्या मुलाला जाऊ दिले नाही, हा मुर्खपणा असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. मंदिरामधील बसलेले पुजारी अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
एकीकडं सध्या मंदिरांमधील ड्रेसकोड वरून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. सप्तश्रृंगी गडावरील मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याच्या हालचाली विश्वस्थांनी सुरू केल्या आहेत. अशातच आज नाशिक येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत छगन भुजबळ बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, कोणत्याही मंदिरात जाताना नीट नेटके कपडे घालावे, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. ड्रेस कोड वर बोलायचे झाले तर उघड्या बंब पुजाऱ्यांनी नीट सदरे घालावे, गळ्यात माळा घालाव्या, म्हणजे ओळखू येतील, ते ही अर्धनग्नच असतात ना.. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढवय्ये होते. आता मात्र उघड बंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर शरद पवार म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांडामध्ये सहभागी झालो नाही, याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असा सोहळा राम मंदिर, शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले.

Editorial
Next Story
Related News
X
