✕
शरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
By EditorialPublished on
शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी अध्यक्षपद सोडल्यास आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित पवारांना (Ajit Pawar) मिळणार की सुप्रिया सुळे (Supriya Sule) वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणार, ही चर्चा आता देशाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली

x
शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी अध्यक्षपद सोडल्यास आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित पवारांना (Ajit Pawar) मिळणार की सुप्रिया सुळे (Supriya Sule) वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणार, ही चर्चा आता देशाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे स्थान मोठे आहे. त्यांची जागा घेणे राष्ट्रवादीतल्या ( NCP ) इतर कोणत्याही नेत्यासाठी सोपे काम नाही.अर्थात अध्यक्षपदाची माळ कुणाला तरी घालावीच लावणार आहे.
पक्षाची भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल स्थापन करण्याची घोषणा पवारांनी केली आहे. पवारांच्या उत्तराधिकारी पदासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेतच.
याशिवाय, जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचेही नाव संभाव्य दावेदारात घेतले जातेय. पवारांच्या अनपेक्षित निर्णयानंतर जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.काही कार्यकर्त्यांनी बसण्याचाही इशारा दिला.उपोषणालादरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पवारांनी भाकरी फिरवत, नवे नेतृत्त्व पुढेआणण्याची गरज बोलून दाखविली होती.
त्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत (Press conference)सर्वांनाच मोठा धक्का दिला. मी केवळ अध्यक्षपदावरून पायउतार होत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
आपण सर्वांसह एकत्रपणे पक्षाचे काम करत राहू असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यापुढे कोणतीही निवडणूक( Election) लढवणार नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

Editorial
Next Story
Related News
X
