the kerala story
'द केरळ स्टोरी : सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' ('The Kerala Story') या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा अ आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या (Indian Union Muslim League) युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर अनेक जण या चित्रपटाला 'प्रोपगंडा चित्रपट '('Propaganda Film') म्हणत आहेत. आता या चित्रपटातील १० दृश्यांना सेन्सॉर बोर्डानि कात्री लावली आहे. 'द केरळ स्टोरी'ला सेन्सॉर बोर्डाने
( Censor Board) प्रमाणपत्र दिले आहे. पण याबरोबरच या चित्रपटातील काही सीन्स कट करण्यात आले आहेत. या चित्रपटातून वगळल्या गेलेल्या दृश्यांमध्ये केरळच्या माजीमुख्यमंत्र्यांच्या (Former Chief Minister) मुलाखतीचाही एक सीन आहे.
केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन (VS Achuthanandan) यांची ही मुलाखत होती, असे सांगितले जात आहे. वादग्रस्त ठरू शकतील अशा सीन्सना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. 'हिंदू देवतांबद्दल चुकीचे संदर्भ आणि अयोग्य संवाद' असलेली दृश्ये सेन्सॉर बोर्डाने हटविण्यास सांगितली आहेत आहे. तर अनेक संवाददेखील बदलण्यास सांगितले आहेत. याशिवाय, चित्रपटात एक संवाद आहे, ज्यामध्ये 'भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत,' असे म्हटले आहे. त्यातून 'भारतीय' हा शब्द काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे. या चित्रपटात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीव्ही मुलाखत दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, 'केरळपुढील दोन दशकांत मुस्लीमबहुल राज्य होईल, कारण राज्यातील तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रभावित केले जात आहे.' सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण टीव्ही मुलाखत चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना धर्मातरा मुसलमान करून दहशतवादी संघटना एए मध्ये सामील केले गेले. केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असून, त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अदा शर्मा (Adah Sharma) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.
Editorial

Editorial

Next Story