✕
राहुल गांधींना पासपोर्ट मिळणार!
By EditorialPublished on
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवीन पासपोर्ट जारी करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला दिल्लीतील न्यायालयाने आज (२६ मे) परवानगी दिली. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टबाबत तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. पासपोर्टबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असेल, असे निर्देश अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी दिले आहेत. याचा अर्थ राहुल गांधींना आता तीन वर्षांनंतर एनओसीसाठी कोर्टात (Court for NOC) अर्ज करावा लागणार आहे.

x
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवीन पासपोर्ट जारी करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला दिल्लीतील न्यायालयाने आज (२६ मे) परवानगी दिली. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टबाबत तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. पासपोर्टबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असेल, असे निर्देश अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी दिले आहेत. याचा अर्थ राहुल गांधींना आता तीन वर्षांनंतर एनओसीसाठी कोर्टात (Court for NOC) अर्ज करावा लागणार आहे.
खरंतर राहुल गांधी यांनी न्यायालयाकडे १० वर्षांसाठी एनओसीची मागणी केली होती, परंतु सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला आणि केवळ एक वर्षासाठी एनओसीसाठी परवानगी देण्याचं म्हटलं होतं. परंतु राहुल गांधींकडे पासपोर्ट जारी करण्यासाठी १० वर्षांची एनओसी (NOC) मागण्याचे कोणतेही वैध किंवा ठोस कारण नाही, असा युक्तिवाद स्वामी यांनी न्यायालयात केला होता.
नवीन पासपोर्टसाठी एनओसी मागणाऱ्या राहुल गांधी यांच्या याचिकेवर बुधवारी (२४ मे) दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या एनओसीला सुब्रमण्यम स्वामींनी विरोध केला. ते म्हणाले की होते की, 'ते (राहुल गांधी) सातत्याने परदेशात जातात. त्याच्यां परदेशवारीमुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो.' सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्वामी यांना उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. या उत्तरात सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना १० वर्षांसाठी पासपोर्ट देण्याच्या याचिकेला विरोध केला होता.
मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं. यानंतर राहुल गांधींनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट (Passport) सरेंडर केला होता.
नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात त्यांचं नाव असल्याने राहुल गांधींना सामान्य पासपोर्ट जारी करण्यासाठी न्यायालयाकडून एनओसीची आवश्यकता आहे.
तसंच नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामीन मंजूर करताना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यावर कोणतेही बंधन घातलं नव्हतं, असं राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.
दरम्यान, राहुल गांधी ३१ मे रोजी आठवडाभरासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे भारतीयांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
