Pratahkal- Marathi News Update - aharashtra is the first 'AI' university in the country
मुंबई : देशातील पहिले 'एआय' विद्यापीठ ('AI' university) १ ऑगस्टपासून (1 August) कर्जतमध्ये सुरु होणार आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ (India's first university) ठरले आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस (Green campus) तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. १ ऑगस्टपासून पहिले शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. विद्यापीठाने एआय आणि फ्युचर टेक्नॉलॉजीतील पदवी आणि विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केला आहे. एआय प्रेरित शिक्षणाला समर्पित पहिले विद्यापीठ म्हणून नवीन युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम देऊ करेल. तसेच लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रिडी विज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही तयार केले आहेत. युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलपती व संस्थापक प्रा. तरुणदीप सिंग आनंद म्हणाले की २१व्या शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले समर्पित एआय विद्यापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे.
Editorial

Editorial

Next Story