Pratahkal - News Update - Aditya Thackeray
मुंबई : शिवसेना नेते (Shivsena leader), युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी २००० हजार नोट बंदीवर (2000 thousand note ban) अभ्यास करावा लागेल. तसच यापूर्वीची नोटबंदी त्याचा ताळेबंद हिशोब मांडला गेला पाहिजे. RBI न स्पष्टीकरण दिले पाहिजे असं परखड मत व्यक्त केलं आहे. मिंधेचा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच कीचड केला आहे. आणि यात रस्ते घोटाळा, फर्निचर खरेदी घोटाळ्या बाबत भाजपच्या माजी नगरसेवकानी पत्र दिले आहे. गद्दार सरकार विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. जस कर्नाटक मध्ये ४०% भ्रष्टाचार सरकार होत. इथ १००% भ्रष्टाचारी सरकार आहे. कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये याकडे आम्ही लक्ष या नवीन सरकारला द्यायला सांगत आहोत
मुंबई महापालिका महापौर (Mumbai Municipal Corporation Mayor) आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे, नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. आमचे सरकार (Government) असताना कोणतेही वाद झाले नाही जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारीसाठी हे वाद आणि दंगली होत आहेत का. राज्यात महिलाना शिवीगाळ होत आहे. त्याच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. त्यांचा अपमान होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची काम पूर्ण होणार नाहित. गोखले ब्रीज मुख्यमंत्री म्हणाले नोव्हेंबरमध्ये होईल. ही डेडलाईन पुढे ढकलली जात आहे. मुनगंटीवार यांना एवढेच सांगीन घटनाबाह्य मुख्यमंत्री राजीनामा देऊन वरळीमध्ये लढत असतील तर मी राजीनामा देईन.
Editorial

Editorial

Next Story