✕
दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्दल घडवणार!
By EditorialPublished on
राज्यात दंगली (Riots in the state) जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्याठिकाणी आता शांतता आहे. पोलिस अलर्ट (Police alert) मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आले की अशाप्रकारे काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत, तेव्हा सगळीकडची पोलिस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करता
_202305161707298097.jpg)
x
_202305161707298097.jpg)
पुणे : राज्यात दंगली (Riots in the state) जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्याठिकाणी आता शांतता आहे. पोलिस अलर्ट (Police alert) मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आले की अशाप्रकारे काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत, तेव्हा सगळीकडची पोलिस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
अकोला (Akola) आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. आता संपूर्ण स्थिती शांततापूर्ण आहे. कुणीतरी जाणूनबुजून राज्यातील शांततेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करते आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था (Law and Order in Maharashtra) बिघडविण्याचा प्रयत्न होतो आहे. असा प्रयत्न जे करतात, त्यांना अजिबात सोडणार नाही. काही संस्था, व्यक्ती हा प्रयत्न करीत आहेत, योग्यवेळी सर्व काही बाहेर आणणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सध्या राज्यात जे चालले आहे, तो कोणत्या लोकशाहीत बसते? आम्ही विधानसभा अध्यक्षांना चालू देणार नाही, फिरु देणार नाही, घेराव करु, अशी भाषा वापरली जाते आहे. ठाकरे गटाची बाजू कमकुवत आहे, हे त्यांना माहिती असल्यानेच अशी भाषा वापरली जाते आहे. विधानसभा अध्यक्ष हे स्वतः एक निष्णात वकील आहेत. ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. 'रिझनेबल टाईम'चा अर्थ त्यांना कळतो आणि मला खात्री आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता, ते कायदा- संविधानसंमत निर्णय घेतील.
महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळताहेत, असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करताहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. 'काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन', असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात काल छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला. दोन गटांमध्ये वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली. त्याआधी १३ मे ला सकाळी ९:३० ते ९:४५ च्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही इतर धर्मीयांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला.
अकोला शहरातही हरिहरपेठेत शनिवारी १३ मे ला रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Editorial
Next Story
Related News
X
