✕
मुंबईत पुराचा धोका टळणार!
By EditorialPublished on
वाहतूककोंडीतून सुटका आणि प्रदूषणमुक्त प्रवासासाठी (Pollution free travel) फायदेशीर ठरणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या (Coastal Road) कामाने वेग धरला आहे. साडेदहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर साडेआठ किलोमीटर लांबीच्या सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईत (Mumbai) पुराचा धोका टळेल, असा दावा महापालिकेने केला आहे. येत्या २३ ते २५ मे या कालावधीत मुंबईत होणाऱ्या जी २०च्या दुसऱ्या आ
_202305161715262383.jpg)
x
मुंबई : वाहतूककोंडीतून सुटका आणि प्रदूषणमुक्त प्रवासासाठी (Pollution free travel) फायदेशीर ठरणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या (Coastal Road) कामाने वेग धरला आहे. साडेदहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर साडेआठ किलोमीटर लांबीच्या सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईत (Mumbai) पुराचा धोका टळेल, असा दावा महापालिकेने केला आहे. येत्या २३ ते २५ मे या कालावधीत मुंबईत होणाऱ्या जी २०च्या दुसऱ्या आपत्ती जोखीम निवारण बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पांतर्गत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्ग हा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी सुमारे १३.६० टक्के क्षेत्रफळ म्हणजे १५ लाख ६० हजार ७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) सागरी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्गाची जोड देताना या मार्गावर प्रियदर्शनी पार्कपासून ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीच अभेद्य अशी सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जात आहे. सध्या सात ते सव्वा सात किलोमीटरपर्यंत या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. ही भिंत साधारण सहा ते नऊ मीटर उंच आहे. भिंत बांधण्यासाठी 'आर्मर रॉक' म्हणजेच बसाल्ट प्रकारचे दगडांचा वापर करण्यात आला आहे. असे एक ते चार टनांचे असलेल्या दगडांचे दोन थर रचण्यात आले आहेत. (पान ३ वर )
पर्जन्यजलवाहिन्यांची सुधारणा
मुंबईत पावसाचे पाणी किंवा नाल्यातील पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करण्याची संधी महापालिकेला यामुळे मिळाली आहे. काही नवे क्षेत्र शहराच्या मुख्य भूभागाला जोडले जाणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या नेटवर्कची कक्षा समुद्राच्या पलीकडे विस्तारली जाणार आहे.
प्रदूषणमुक्त प्रवास
मुंबई सागरी किनारा (Mumbai Seashore) मार्गामुळे वाहनांचा वेग वाढेल, इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनामध्येही घट होईल. मरीन ड्राईव्ह ते वरळी या दरम्यानच्या प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत होणार आहे. या पट्ट्यात पर्यावरणाचे संरक्षण आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी उद्याने असतील.
बोगद्यांतील सुरक्षेची वैशिष्ट्ये
- दोन बोगद्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
- वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असेल.
- वाहनांच्या वेगाची मोजणी, मार्गिकांचे उल्लंघन दर्शवणारे कॅमेरे असतील.
- तापमान दशविणारे कॅमेरे आणि अन्य यंत्रणाही असेल.

Editorial
Next Story
Related News
X
