✕
'पहाटेचा शपथविधी' राजकीय ऑपरेशन
By EditorialPublished on
पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन (State operation) होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. मुनगंटीवार म्हणाले, भाजपशी (BJP) युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
_202305151911485232.jpg)
x
_202305151911485232.jpg)
मुंबई : पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन (State operation) होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. मुनगंटीवार म्हणाले, भाजपशी (BJP) युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
२०१९ साली महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. गडबड होऊ नये यासाठी दक्षता घेत भल्या पहाटे राजभवनावर जाऊन या दोघांनी शपथ घेतली. परंतु हे सरकार अल्पायुषी ठरले. गेल्या काही दिवसात पहाटेच्या शपथविधीबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, राजकारणात काही वेळा परिस्थितीनुसार तात्कालिक स्वरूपात आपद्धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. अजित पवार भाजपमध्ये येणार, याबाबत मी प्रसिद्धीमाध्यमातूनच बातम्या पाहात आहे. शरद पवारांनीही उद्या पाठिंबा दिला, तर तो घेणार नाही, असे आम्हाला कसे म्हणता येईल? असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला होता. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते.

Editorial
Next Story
Related News
X
