PratahkalLive-Maharashtra-Karnataka-Uddhav Thackeray

महाराष्ट्राच्या (Maharashtra) सत्ता संघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज (१३ मे) मातोश्री इथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही (Karnataka Assembly Election Results) चर्चा झाली. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात
(Karnataka)
नाकारलं आहे. भाजपचं (BJP) फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. भाजपला कर्नाटकातून घालवलं आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना दिला. आमदारांच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा झाली. सर्व आमदारांना हा निकाल समजावून सांगण्यात आला.
हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे सांगण्यात आलं. 'आता हा निकाल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे लोकांचा या निकालावर विश्वास वाढेल,' असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलं. तसंच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.

Editorial

Editorial

Next Story