Uddhav Thackeray
निवडणूक आयोग (Election commission), राज्यपाल ब्रह्मदेव नाही. सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. आता नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी (Shinde-Fadnavis) राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडली. यावेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव उपस्थित होते. या दोघांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे. राज्यपालांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढत नबाम रेबियाप्रमाणे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विचार करता येणार नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. या साऱ्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही कायदेशीररित्या चूक ठरली असेल पण या गद्दारांकडून अविश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं मला तेव्हाही मान्य नव्हतं आजही मान्य नसेल असे म्हटले. तसेच जर सध्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, याबद्दल आहे. सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली. राज्यपाल महोदयांची भूमिका सरळसरळ अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना कायम ठेवण्याचं तसेच अपात्रतेचा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी आता द्यावा असं म्हटलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी फूटीरांचा व्हीप आता मला मान्य नाही. त्यामुळे माझ्याच शिवसेनेचा व्हिप कायम राहणार असं उद्धव ठाकरेंचं मत आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील शिक्षा मिळायला हवी असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग ब्रम्हदेव नाही मतांच्या टक्केवारीवर असे कोणाला नाव, पक्ष चिन्हें देखील देणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहे. आपल्याकडून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह काढलं जाऊ शकत अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे. ज्या पक्षाने ज्यांना सगळे काही दिले. मात्र, तरी सुद्धा ते माझ्या पाठीत वार करायला निघाले. ज्यांनी विश्वासघात केला, तेच जर मला विश्वासाबद्दल विचारत असतील, तर ते अयोग्य आहे. त्यामुळे भी राजीनामा दिला. सगळे देऊनही काही हपापले लोक माझ्यावर अविश्वास व मंजूर नव्हते. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता थोडी नैतिकता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. मातोश्रीवर मीडीयाशी बोलताना उद्धव ठाकरेंसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील होते. सध्या आपण आमच्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी त्याच्या विरोधकांसमोर एकत्र लढत असल्याचं म्हटलंआहे.
राजीनामा देणं चुकलं असेलही पण...
देशामध्ये एकूणच लोकशाहीची हत्या होते की काय असे दिसते आहे. आजच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे. हा निर्णय जो दिला आहे त्यामरध्ये राज्यापालांची भूमिका सरळरसरळ चुकीची होती, असे म्हटले आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती. पण आता ही यंत्रणा ठेवावी की नाही याबाबत कोर्टात जावे लागेल, असे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले. अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा माझी शिवसेना म्हणजे त्यावेळची शिवसेना यांचाच राहील असे म्हटल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी कोर्टाने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचे सरकार परत आणले असते असे म्हटले आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे. राजीनामा देणं कायदेशीररित्या चुकलं असेलही पण ज्यांना शिवसेनेने सर्व काही दिलं त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नव्हतं, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच माझ्याच शिवसेनेचा व्हीप लागू होणार. फुटीरांचा व्हीप कोर्टाकडून अमान्य झाला आहे. माझ्याप्रमाने शिंदे- फडणवीसांनीही राजीनामा द्यावा, असे ठाकरे म्हणाले आहेत.
Next Story