Rahul Gandhi
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ (Delhi University) राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस बजावणार आहे. न कळवता विद्यापीठाच्या कॅम्पसला भेट (University campus visit) दिल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव विकास गुप्ता (University Registrar Vikas Gupta) म्हणाले की, 'अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येते आणि अशा कोणत्याही संवादासाठी योग्य प्रोटोकॉलचे (Protocols) पालन करणे आवश्यक आहे, असं विद्यापीठकडून राहुल गांधी यांना नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात येईल.' राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात शुक्रवारी (५ मे) विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन हॉस्टेलला भेट दिली होती. इथे त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं होतं. मात्र ही अनधिकृत भेट असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी आत गेले तेव्हा विद्यार्थी जेवण करत होते. आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये हे सहन करु शकत नाही. कॅम्पसच्या वतीने राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांनी पुन्हा असं कृत्य करु नये, असं नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येईल. दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) केला आहे. त्याचवेळी कुलसचिव विकास गुप्ता यांनी हे आरोप फेटाळून लावत असा कोणताही दबाव नसल्याचं सांगितलं. ही शिस्तीची बाब असल्याचे ते म्हणाले. अशा घुसखोरीच्या घटना टाळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, जेणेकरुन भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असे त्यांनी सांगितलं.
Editorial

Editorial

Next Story