✕
बारसु आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट
By EditorialPublished on
बारसु येथे होत असलेल्या रिफायनरीला कोकणवासियांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे.
_202305012034424586.jpg)
x
_202305012034424586.jpg)
बारसु येथे होत असलेल्या रिफायनरीला कोकणवासियांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण (Satyajit Chavan) यांनी तुरुंगातून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत स्वतः शरद पवार यांनी आज ट्विट करीत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हेदेखील उपस्थित होते. यावेळी बारसु येथे होत असलेली रिफायनरी, आंदोलकांची भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Next Story
Related News
X

