Sanjay Raut
मुंबई : “महाराष्ट्र संकटात आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणे सुरू आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत घाणेरडे राजकारण होत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभीमानावर, अस्मितेवर आघात होत आहे. मन की बात मुळे कळले की सरकारकडे खूपच वेळ आहे; पण राज्यात आणि देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर सरकार कुठलीही मन की बात करत नाही. " असा घणाघात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी आज केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मविआतर्फे वज्रमूठ सभेचे आयोजन शिवसेनेकडून होत आहे. युवासनाप्रमुख आदित्य ठाकरे यात जास्त लक्ष घालत आहे. एक मे रोजी सभा होणार आहे. या दिवशी महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळेच या सभेचे आयोजन केले आहे.
संजय राऊत म्हणाले, एक मे या दिवशी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सभा होणे याला महत्व आहे. महाराष्ट्र संकटात आहे. महाराष्ट्र संकटात आहे. लचके तोडणे सुरू आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत घाणेरडे राजकारण होत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभीमानावर, अस्मितेवर आघात होत आहे.
संजय राऊत म्हणाले, मविआची सभा ऐतिहासिक होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक या सभेला उपस्थित राहतील. अजित पवार, नाना पटोले या सभेला उपस्थित राहतील. भाषणाचे मुख्य आकर्षण उद्धव ठाकरेच राहतील कारण मुंबईत सभा आहे.
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या सभेचे सूत्र आहे की, सभा आटोपशीर व्हावी. लोक लांबून येतात. त्यांना सुरक्षित घरी जायचे असते. भाषण लांबवून त्यांची गैरसोयही होता कामा नये म्हणून सभेत महत्वाचे, मोजकेच नेते बोलतील.
मन की बातवर संजय राऊत म्हणाले, सरकारला किती वेळ आहे आणि काम आहे हे या निमित्ताने आज दिसले. केंद्रातील प्रमुख, राज्यातील प्रमुख तासन् तास एकत्र बसून भाषण ऐकतात. राज्यात अनेक प्रश्न आहेत. देशात अनेक प्रश्न आहेत. त्यावर कुठलीही मनकी बात केली जात नाही. फक्त राजकारण केले जाते.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील मुख्यमंत्री होईल असे दावे केले जात आहेत. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल. त्याआधी एकत्रित चर्चा, बैठक घेवून निर्णय होत असतात. उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री केले तो महाविकास आघाडीचाच निर्णय आहे. प्रत्येकाच्या मेळाव्यात वेगवेगळे बोलले जाईल. पण महाविकास आघाडीची एकत्रित बैठक महत्वाची त्यातील निर्णय महत्वाचा असेल.
Editorial

Editorial

Next Story