✕
जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊन कामाला लागले
By EditorialPublished on
जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. त्यांनी धास्ती घेतली की नाही माहित नाही पण कामाला लागले आहेत, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामल्लांचं दर्शन घेणार आहेत.
_202304081504495777.jpg)
x
_202304081504495777.jpg)
ठाणे : जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. त्यांनी धास्ती घेतली की नाही माहित नाही पण कामाला लागले आहेत, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाणे रेल्वेस्थानकात (Railway station) आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) म्हणाले होते की, 'राम हे दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊन कामाला लागले प्रतिक्रिया (Feedback) विचारली असता, शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घेत आहेत हे चांगलं आहे. यावर माध्यमांच्या (Mediums) प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना (Chief ministers) विचारलं की, तुमच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी विरोधकांना आणि प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत टोला लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतलीय की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे. जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अनेकदा उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका केली होती.

Editorial
Next Story
Related News
X
