Savarkar Gaurav Yatra Eknath shinde
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज ठाणे शहरातून वीर सावरकर गौरव यात्रेला (Veer Savarkar Gaurav Yatra) प्रारंभ झाला. सावरकर यांच्या गौरवासाठी काढण्यात आलेल्या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भाजप आणि शिंदे (BJP & Shinde) गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या महिन्यात सावरकरांच्या दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या त्यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली होती. मी सावरकर संदेश असलेल्या भगव्या टोप्या घालून लोक गौरव यात्रेत सहभागी झाले होते. ठाणे
(Thane)
शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना पुष्पहार अर्पण केला. येथून यात्रा सुरु झाली. शिंदे यांच्यासह सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे नेतेही यात्रेत सहभागी झाले होते. रथ फुलांनी सजवण्यात आला होता आणि त्याच्या पाठोपाठ मोटारसायकलवरून समर्थक येत होते.
मुख्यमंत्र्यांनी शहरातील चार विधानसभा (Assembly) मतदारसंघातून फिरत अभिवादन केले. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवरही पुष्पवृष्टी करण्यात आली. या यात्रेत भाजप नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे, ठाण्याचे आमदा संजय केळकर, ठाणे भाजपचे अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह सत्ताधारी आघाडीचे अनेक स्थानिक नेते सहभागी झाले होते. यात्रेत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दादरमध्ये भाजप-शिवसेनेची गौरव यात्रा शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे जवाब दो' च्या घोषणा
दादरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. शिवसेना भवनासमोरुन शिंदे-भाजपची सावरकर गौरव यात्रा रवाना झाली. यावेळी शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जवाब दो'च्या घोषणा देण्यात आल्या. या यात्रेत भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. यावेळी भाजप आणि शिवसेनेचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं.
Editorial

Editorial

Next Story