Uday Samant
नाशिक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचे पत्र देखील सामंत यांनी यावेळी दाखवले.
आज मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरु आहे. पार्श्वभूमीवर आज सकाळी सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले की, नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. काल देखील याबाबत बैठक झाली. ज्याला मला भेटायचे आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असे जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळले की आंदोलन होत नाही, म्हणून सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनीच सुचवले होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi)
यांना पत्र लिहिले होते. १२ जानेवारी २०२२ रोजीचे हे पत्र आहे. बारसूमध्ये १३ हजार एकर जमीन राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. राज्य सरकारच्या (State government) या पत्रानंतरच केंद्र सरकारने बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सोशल माध्यमांवर (Social media) देखिल व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बारसू विरोधात बोलणाऱ्या ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे. ते म्हणाले की, बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असे म्हटले जात आहे.' ते पुढे म्हणाले की, 'सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. फक्त एका व्यक्तीबाबत हा प्रश्न आला आहे, ते उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने झाले असावे, असे सामंत म्हणाले.
Editorial

Editorial

Next Story