'First step' in the education department
मुंबई : महाराष्ट्र राज्याला शिक्षणाची दीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची (Female education) मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रिबाई फुलेंसारखे (Krantijyoti Savitribai Phule) आदर्श घरोघरी निर्माण करण्याचे कार्य 'पहिले पाऊल' या उपक्रमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) (Brihanmumbai Municipal Corporation Education Department)
यांच्या संयुक्त वतीने आयोजित व 'स्टार्स' प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान–२०२३ 'पहिले पाऊल' शाळास्तर उद्घाटन मेळावा आज सकाळी महानगरपालिकेच्या वरळी सी फेस महानगरपालिका शाळेमध्ये पार पडला.
यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक श्री. कैलास पगारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप सांगवे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक मनीषा पवार, प्रथम संस्थेच्या सचिव फरिदा लांबे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी मालती टोणपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
केसरकर (Kesarkar) म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या-ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या-त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे.
रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही केसरकर यांनी केले.
'पहिले पाऊल' ठरणार ऐतिहासिक पाऊल
शिक्षण विभागातील 'पहिले पाऊल' ('First step' in the education department) हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 'मी भारतीय' ही कविता सादर करून पालकांची मने जिंकली. 'पहिले पाऊल' या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची श वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतूक केले.

Editorial

Editorial

Next Story