✕
आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करा
By EditorialPublished on
नवीन सरकार (New government) सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होत नाही, ४३ मंत्र्यांपैकी फक्त वीस मंत्रीच कामकाज करीत आहेत, २३ मंत्र्यांच्या जागा रिकाम्या आहेत, राज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली नाही, एकाही महिलेला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले नाही, असे असताना राज्य सरकार विविध विषयांवर जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.

x
बारामती : नवीन सरकार (New government) सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होत नाही, ४३ मंत्र्यांपैकी फक्त वीस मंत्रीच कामकाज करीत आहेत, २३ मंत्र्यांच्या जागा रिकाम्या आहेत, राज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली नाही, एकाही महिलेला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले नाही, असे असताना राज्य सरकार विविध विषयांवर जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.
बारामतीत रविवारी ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीला भेगा पडू लागल्या आहेत, अशा स्वरूपाची टीका सत्ताधारी पक्षाकडून झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अवकाळी पावसाने झालेले नुकसान, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यासारख्या मूलभूत समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
दहा महिन्यांचा कालावधी होऊन देखील मंत्रिमंडळातील निम्म्याहून अधिकच्या जागा रिकाम्या आहेत आणि अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नाही ही नामुशकी आहे. सरकारने या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी विरोधकांवर टीका करण्यात अर्थ नाही.
खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे, कारण प्रशासकीय चौकशी निपक्षपातीपणे होईल अशी स्थिती नाही, त्यामुळेच आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी केल्याचे ते म्हणाले.
या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कमालीचा निष्काळजीपणा झाला हे उघड आहे, यामुळे अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले, त्यामुळे सरकारने या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे असे ते म्हणाले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी १५ ते २० दिवसात सरकार कोसळेल असे म्हटले आहे, याबाबत विचारता ते म्हणाले माझी व संजय राऊत यांची अलीकडे भेट झालेली नाही, त्यामुळे त्यांना याबाबत काय माहिती आहे याची मला माहिती नाही, त्यामुळे मी याबाबत प्रतिक्रिया देणार नाही.
मुंबईच्या (Mumbai) वङ्कामूठ सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही, याबाबत विचारतात ते म्हणाले की, स्वत: उद्धव ठाकरे यांनी याबाबतची जबाबदारी स्वीकारली आहे ते या संदर्भात संबंधितांशी बोलणार आहेत, त्यामुळे ही परवानगी मिळेल.
इतर नेत्यांनी काय मत व्यक्त करावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यांना ती मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस कोणी काय म्हणाले यावर मी काहीतरी प्रतिक्रिया द्यावी योग्य नाही, असे म्हणत माध्यमांना हेडलाईन्स द्यायला काहीतरी लागते त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारता, अशी नाराजी अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
कोण काय म्हणाले याबाबतचे प्रश्न विचारण्यापेक्षा सुद्धा राज्यातील बेरोजगारी, महागाई, अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Editorial
Next Story
Related News
X
