✕
आयवूमीद्वारे ई-स्कुटर्स खरेदीवर सवलत जाहीर
By EditorialPublished on
आयवूमी एनर्जीद्वारे (Ivoomi Energy) एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट या सर्व गाड्यांवर अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) निमित्ताने विशेष ऑफर्स आणि सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आयवूमी स्टोर्समध्ये एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट यांच्यासह गाड्यांवर सेल सुरु आहे, ७०,००० पासून ९१,९९९ रुपये किमतींच्या गाड्यांवर डिस्काऊंट्स आणि डील्स देण्यात आल्या आहेत. अॅक्सेसरीज आणि इन्श्युरन्स (Insurance) यांचा डीलमध्ये समावेश आहे. ही विशेष सवलत २९ एप्रिल २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. १०,००० हुन जास्त आनंदी कुटुंबांचा आयवूमी एनर्ज

x

मुंबई : आयवूमी एनर्जीद्वारे (Ivoomi Energy) एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट या सर्व गाड्यांवर अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) निमित्ताने विशेष ऑफर्स आणि सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आयवूमी स्टोर्समध्ये एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट यांच्यासह गाड्यांवर सेल सुरु आहे, ७०,००० पासून ९१,९९९ रुपये किमतींच्या गाड्यांवर डिस्काऊंट्स आणि डील्स देण्यात आल्या आहेत. अॅक्सेसरीज आणि इन्श्युरन्स (Insurance) यांचा डीलमध्ये समावेश आहे. ही विशेष सवलत २९ एप्रिल २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. १०,००० हुन जास्त आनंदी कुटुंबांचा आयवूमी एनर्जी परिवारात समावेश झाला आहे. उपयुक्त वैशिष्ट्ये परवडण्याजोग्या दरांमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या आयवूमी एनर्जीने सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या, विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या स्वदेशी निर्मात्यांमध्ये स्थान मिळवले आहे. १०० टक्के भारतीय बनावटीची आयवूमी जीतएक्स अतिशय सुबक आणि आधुनिक असून अमेंडमेंट घ् फेज १ एआयएस १५६ सटिफिकेशन नुसार आता अजून जास्त सुरक्षित बनवण्यात आली आहे. आकर्षक आणि तरीही सहजसोपे डिझाईन (Design) असलेली जीतएक्स ग्राहकांचे लक्ष सहजपणे वेधून घेते. नव्या डिझाईनमध्ये गाड्यांचा एकंदरीत आकर्षकपणा वाढवण्यात आला असल्याने त्या पूर्वीपेक्षा जास्त शानदार दिसत आहेत. आयवूमीचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री. अश्विन भंडारी यांनी सांगितले, आयवूमी ही कंपनी ग्राहकांच्या गरजा सातत्याने समजून घेते व त्या पूर्ण करण्यासाठी उपयुक्त व सर्वसमावेशक उत्पादने, सुविधा पुरवते.

Editorial
Next Story
Related News
X
