✕
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारासह इतर फलंदाजांच्या १६ बॅट्सची चोरी
By EditorialPublished on
आयपीएल (IPL) २०२३ मध्ये, सर्वात वाईट स्थितीत असलेल्या दिल्ली (Delhi) कॅपिटल्सशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांची बॅट, पॅड, हातमोजे आणि शूजही चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र सर्वात धक्कादायक (Shocking) बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे.

x
मुंबई : आयपीएल (IPL) २०२३ मध्ये, सर्वात वाईट स्थितीत असलेल्या दिल्ली (Delhi) कॅपिटल्सशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांची बॅट, पॅड, हातमोजे आणि शूजही चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र सर्वात धक्कादायक (Shocking) बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुमारे अर्धा डझन फलंदाजांच्या १६ बॅट्स चोरीला गेल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बंगळुरूमध्ये (In Bangalore) रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers) बंगळुरूविरुद्ध सामना खेळल्यानंतर जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीला पोहोचले. त्यानंतर त्यांच्या किट बॅग त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या ३ बॅट्स, मिचेल मार्शच्या २ बॅट्स, फिल सॉल्टच्या ३ आणि यश धुलच्या ५ बॅट्स चोरीला गेल्या आहेत. याशिवाय काहींचे पॅड, काहींचे ग्लब्ज, काहींचे शूज आणि क्रिकेटचे इतर साहित्य दिल्लीत पोहोचले नाही, याला नक्कीच चोरी म्हणावे लागेल. मात्र, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी सराव सत्र आयोजित केले. काही फलंदाजांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि त्यांच्या बॅट कंपन्यांना पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्याची विनंती केली. परदेशी खेळाडूंना त्यांच्यासारखी बॅट एवढ्या लवकर मिळणे अवघड आहे, पण विदेशी बॅट बनवणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत. त्यामुळे त्यांना येथे बॅट मिळू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Editorial
Next Story
Related News
X
