✕
अजित पवार भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत पण...
By EditorialPublished on
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये (BJP) येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत येत असेल तर शिवसेना (Shivsena) बाहेर पडेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी केले आहे.
_202304191605312537.jpg)
x
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये (BJP) येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत येत असेल तर शिवसेना (Shivsena) बाहेर पडेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण (Politics of maharashtra) ढवळून निघाले आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद (Press conference) घेतली.
संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.
Next Story
Related News
X

