Distribution of National Panchayat Awards
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत (New Delhi) राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण (Distribution of National Panchayat Awards) तसेच पंचायतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन झाले. गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण वेगाने वाढले असून देखील बहुतांश लोकसंख्या (Population) अद्याप ग्रामीण भागात राहते आहे, जे शहरात वास्तव्य करत आहेत ते देखील या ना त्या कारणाने गावांशी जोडले गेले आहेत, गावांच्या विकासामुळेच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
गावाच्या विकासाची रूपरेषा
(Village Development Plan)
किंवा आराखडा कसा असावा आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी, याचा निर्णय ग्रामीण जनतेला घेता यायला हवा, असे त्यांनी सांगितले.
पंचायत (Panchayat) म्हणजे केवळ सरकारी उपक्रम आणि योजना राबवण्याचे साधन नव्हे तर नवे नेतृत्व, योजनाकर्ते, धोरण कर्ते आणि नवोन्मेषक तयार करण्याचे, घडवण्याचे स्थान असायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. एका पंचायती मधील सर्वोत्तम पद्धती इतर पंचायतींमध्ये अंमलात आणून आपली गावे आपण लवकर विकसित आणि समृद्ध करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या ३१.५ लाखाहून अधिक निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी ४६ टक्के महिला आहेत, याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या कार्यात महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि या कार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महिलांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन देखील राष्ट्रपतींनी केले.
या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते (Faggan singh kulaste), केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर, काही केले. पुरस्कार केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
Editorial

Editorial

Next Story