✕
महाराष्ट्रात रामराज्य कधी येणार?
By EditorialPublished on
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

x
नागपूर : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या सोन्या सारख्या पिकाचं नुकसान झालं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंचनामा करायला देखील सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काम करायचं असेल तर कुठूनही करु शकतो. नुसतंच वण वण फिरल्यावर काम होतं, असं नसतं. महागाई वाढत चालली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात, नागपूरमध्ये येणारी एअरबस गुजरातमध्ये गेली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार (Government) स्थापन करुन एकनाथ शिंदे यांनी ८ महिन्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. ८ वर्षांपेक्षा अधिक सरकार मोदींचं केंद्रात आहे. पण, तुम्ही जनतेला मुलासारखं सांभाळू शकले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जे बोलले ते तुम्हाला पटतंय का? शिवसेनाप्रमुखांचं योगदान नाकारता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X
