Rahul Gandhi

कोलार : पंतप्रधानजी, तुम्ही अदानींना (Adani) मनापासून मदत केली, गौतम अदानी (Gautam Adani) हे भ्रष्टाचाराचे (Corruption) प्रतीक आहेत. मी त्यांना घाबरत नाही. मी पुन्हा सांगतो, पंतप्रधान (Prime minister), अदानीच्या शेल कंपनीतील हे २०,००० कोटी रुपये कोणाचे आहेत? याचे उत्तर मिळेपर्यंत मी थांबणार नाही. मला अपात्र करा, तुरुंगात टाका, माझी हरकत नाही ते करा, अशी सडकून टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला तसेच अदानीच्या डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Defense infrastructure) कंपनीत चीनचे संचालक बसले आहेत. त्यांच्या शेल कंपनीत चीनचा डायरेक्टर आहे. याबाबत कोणताही तपास सुरू नाही, असा गंभीर आरोपही केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, तुम्ही अदानीला हजारो कोटी रुपये देऊ शकत असाल तर आम्ही गरीब, महिला आणि तरुणांना पैसे देऊ शकतो. आम्ही कर्नाटकच्या जनतेला मनापासून मदत करू. आम्ही कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने दिली आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक घरातील कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज दिली जाईल. दुसरे वचन प्रत्येक महिलेला दरमहा २००० रुपये दिले जातील. तिसरे आश्वासन म्हणजे दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. चौथी योजना अशी आहे की कर्नाटकातील प्रत्येक पदवीधराला ३००० रुपये आणि डिप्लोमाधारकाला २ वर्षांसाठी दरमहा १५०० रुपये दिले जातील.
Editorial

Editorial

Next Story