✕
शेतकरी, कष्टकरी व महिलांना दिलासा देणारे सरकार : उपमुख्यमंत्री
By EditorialPublished on
यावर्षीच्या अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्यात आला असून, त्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर महिलांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. सद्याचे भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) युतीचे सरकार (Government) गतिमान सरकार असून, विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. रिसोड येथे १३ एप्रिल रोजी आयोजित संकल्प सभेमध्ये ते बोलत होते.
_202304141442162823.jpg)
x
रिसोड : यावर्षीच्या अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्यात आला असून, त्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर महिलांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. सद्याचे भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) युतीचे सरकार (Government) गतिमान सरकार असून, विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. रिसोड येथे १३ एप्रिल रोजी आयोजित संकल्प सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, माजी खासदार अनंत देशमुख (Anant Deshmukh) यांचे रूपाने विदर्भातील जाणते व समजदार नेतृत्व भाजपामध्ये आल्यामुळे विदर्भात भाजप आणखी मजबूत होणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नेतृत्वात विकासाचा अजेंडा आपले सरकार राबवीत आहे. पाच वर्षात मोठे प्रकल्प, बंधारे, समृद्धी महामार्ग ज्यामुळे वाशीम जिल्ह्याला कृषी व्यवसायाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठित खंजीर खुपसल्याचे सांगून अडीच वर्षे नाकर्ते सरकार म्हणून विदर्भाचे विकासाचा एकही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खरी शिवसेना आता सोबत असून, विकासाची दालने उघडल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२००० कोटी रुपये वाटप केले. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. मात्र ती फुसकी ठरली, मात्र आमच्या सरकारने ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. शेतकरी सन्मान योजनेत केंद्र सरकार (Central government) प्रमाणे राज्य सरकारने सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला व याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विरोधी पक्षावर टीका करताना विरोधी पक्षाच्या वज्रमुठेला भेगा पडल्या असून, आमची वज्रमूठ मात्र सर्वसामान्यांचे विकासाची मूठ आहे. सध्या विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे सरकार गतिमान सरकार म्हणून सर्वांच्या विकासासाठी सदैव झटत असल्याचे सांगितले. या संकल्प सभेचे आयोजन युवा नेते अॅड. नकुल देशमुख मित्र मंडळ यांनी केले होते. या संकल्प सभेस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अनंत देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार निलय नाईक, आमदार हरीश पिंपळे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार लखन मलिक, माजी आमदार विजय जाधव, माजी आमदार गजानन घुगे, माजी मंत्री संजय कुटे, रणजित पाटील, भाजपा नेते राजू पाटील राजे, पाटील राजे, युवा नेते अनुप धोत्रे, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांचे सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Editorial
Next Story
Related News
X
