✕
केईएम रुग्णालयात आठवडाभरात सुरू होणार स्वतंत्र कोरोना बाह्यरुग्ण विभाग
By EditorialPublished on
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने सर्व रुग्णालयांतील सज्जतेचा आढावा घेतला असून आता केईएम रुग्णालयामध्ये (KEM Hospital) कोरोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.

x

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने सर्व रुग्णालयांतील सज्जतेचा आढावा घेतला असून आता केईएम रुग्णालयामध्ये (KEM Hospital) कोरोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केईएम रुग्णालयामध्ये आठवडाभरात कोरोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत (Dr. Sangeeta Rawat) आणि विविध विभागांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खोकला, थंडी आणि ताप (सीसीएफ) यासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी, त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविणे, तसेच कोरोना चाचणीच्या अहवालानुसार (Report of corona test) रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बाह्यरुग्ण विभागामध्ये कोरोना रुग्णांसह 'एच३ एन२' आणि सर्वसाधारण ताप, थंडी व खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांवरही उपचार करण्यात येणार आहेत. कोरोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या आठवड्यामध्ये हा विभाग सुरू करण्यात येईल. कोरोना बाह्यरुग्ण विभागामध्ये सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याबरोबरच त्यांची लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा किंवा घरातच विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसिन (Community medicine) विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. विजयकुमार सिंग यांनी दिली.
रुग्णालयामधील कर्मचारी सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाची लागण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवस सक्तीने विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे.

Editorial
Next Story
Related News
X
