Elon Musk
मुंबई : ट्विटर (Twitter) युझर्सना ब्ल्यू टिकचे (Blue tick) सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आता केवळ ८ दिवसांची मुदत उरली आहे. येत्या २० तारखेपर्यंत ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन (Subscription) घेतले नाही तर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या ब्ल्यू टिक व्हेरिफाइड अकाऊंट आहे त्यांना येत्या २० एप्रिलपर्यंत ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल.
ट्विटर प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी बुधवारी याविषयीचे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'लीगसी ब्ल्यू चेकमार्क हटवण्याची शेवटची तारीख आहे २० एप्रिल.' याआधी हा चेकमार्क हटवण्याची तारीख १ एप्रिल ठेवण्यात आली होती. ट्विटरने म्हटले होते की, एक एप्रिलपासून आम्ही लीगसी व्हेरिफाइड प्रोग्राम संपवणे आणि लीगसी व्हेरिफाइड
(Verified)
चेकमार्क परत घ्यायला सुरूवात करू.
ब्ल्यू चेकमार्क आधी राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्तीमत्वे, पत्रकार आणि दुसऱ्या सार्वजनिक व्यक्तीमत्वांच्या व्हेरिफाइड अकाऊंटसाठी राखीव होता. मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर ते ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवेत जोडण्यात आले होते.
तुमच्या अकाऊंटला एक डिस्प्ले नेम आणि प्रोफाइल फोटो (Profile photo) असावा, ब्ल्यू सर्व्हिससाठी अकाऊंट गेल्या ३० दिवसांपासून अॅक्टिव्ह असाव, अकाऊंट ९० दिवसांपेक्षा जास्त जूने आणि कन्फर्स्ट फोन नंबर असायला हवा, प्रोफाइल फोटो, डिस्प्ले नेममध्ये अलिकडेच कोणताही बदल केलेला नसावा, अकाऊंट मिसलीडिंग असल्याचे कोणतेही संकेत नसावे, अकाऊंट स्पॅम असल्याचे कोणतेही संकेत नसावे, ट्विटर टीमने रिव्ह्यू केल्यानंतरच अकाऊंटवर ब्ल्यू चेकमार्क दिसेल. सर्व निकष पूर्ण केल्याची खात्री ट्विटर टीमला पटल्यानंतरच हा चेकमार्क दिला जाईल. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाऊंटचे चेकमार्कही हटवले जाऊ शकतात.
२०२३ च्या अखेरपर्यंत ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याची मस्क यांची योजना आहे. त्यांनी महसूल गोळा करण्यासाठी ब्ल्यू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवा मॉडिफाय केल्या आहेत. भारतात अँड्रॉइड आणि आयओएस युझर्सना ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी ९०० दरमहा मोजावे लागतील. तर वेब युझर्सना ६५० रुपये मोजावे लागतील. युझरने वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर त्यांना सूट मिळेल. ७८०० रुपयांऐवजी ६८०० रुपये द्यावे लागतील.
२० मार्चपासून सुरक्षा फीचर टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन बंद करण्यात आले आहे. हे केवळ ब्ल्यू टिक सबस्क्रायबर्सनाच दिले जात आहे. टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून अकाऊंट जास्त सुरक्षित बनवण्यासाठी अकाऊंट होल्डरला पासवर्डशिवाय सेकंड ऑथेन्टिकेशन (Authentication) मेथडचा वापर करता येतो. जर तुमच्याकडे आधीच २FA फीचर असेल तर ते कायम ठेवण्यासाठी ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. ही अगदी सोपी आणि वेगवान प्रक्रिया आहे. यासाठी काही मिनिटेच लागतात. युझर्सना आपल्या अकाऊंटच्या सेटिंग पेजवर जावे लागेल.
Editorial

Editorial

Next Story