✕
म्हाडाच्या ४ हजारांहून अधिक घरांसाठी मे महिन्यात सोडत
By EditorialPublished on
म्हाडाच्या (Mhada) कोकण (Kokan) मंडळाची सोडत जाहीर झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान म्हाडाच्या मुंबई (Mumbai) मंडळाकडून सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना (Mumbai Building Repair & Reconstruction) मंडळाकडून मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात आले असून मे महिन्यात सोडतीची जाहिरात (Advertisement) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
_202304121645066333.jpg)
x
_202304121645066333.jpg)
मुंबई : म्हाडाच्या (Mhada) कोकण (Kokan) मंडळाची सोडत जाहीर झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान म्हाडाच्या मुंबई (Mumbai) मंडळाकडून सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना (Mumbai Building Repair & Reconstruction) मंडळाकडून मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात आले असून मे महिन्यात सोडतीची जाहिरात (Advertisement) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर, प्रतीक्षा नगर आणि दक्षिण मुंबईतील घरांसह इतर विखुरलेल्या गाळ्यांचा समावेश असणार आहे.
याआधी सोडतीसाठी घरे उपलब्ध होऊ न शकल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत गेले काही वर्षे काढण्यात आली नाही. मुंबई मंडळाने हाती घेतलेले प्रकल्प अंतिम टप्यात पोहचले असल्याने मंडळाने दिवाळीमध्ये सोडत काढण्याची तयारी सुरु केली होती.
त्यामुळे मुंबईकरांची उत्सुकता वाढली. मात्र सोडतीच्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण न झाल्याने सोडत काढता आली नव्हती. अखेर जानेवारी महिन्यात सोडत काढण्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या सोडतीमध्ये अधिकाधिक घरांचा समावेश करण्यासाठी गेले काही महिन्यांपासून मंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत.
सोडतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विविध विभागांनी घरांची संख्या अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविलेली नाही. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळालेल्या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. पुढील दोन आठवड्यात घरांच्या किमती अंतिम करून मे महिन्यात सोडत काढण्यात येईल, असे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

Editorial
Next Story
Related News
X
