✕
चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा स्वतः राजीनामा द्या
By EditorialPublished on
बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात लपले होते. भाजपकडे (BJP) कोणतेही शौर्य नव्हते. बाबरी पाडली त्यावेळी दंगली झाल्या. त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई (Mumbai) वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आ आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. त्यावर उद्धव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंन
_202304121614269444.jpg)
x
_202304121614269444.jpg)
मुंबई : बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात लपले होते. भाजपकडे (BJP) कोणतेही शौर्य नव्हते. बाबरी पाडली त्यावेळी दंगली झाल्या. त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई (Mumbai) वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आ आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. त्यावर उद्धव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, काल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. बाबरी मशिदीबाबत पाडल्याची बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत.
भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी (Chief minister) राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी.
मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांना हिंमत झाली नाही. शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे, शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये.
बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसते ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वत:च स्वत:ला जोडे मारणार आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Editorial
Next Story
Related News
X
