खेळाच्या माध्यमातून आध्यात्मिकतेचा प्रसार

कल्याण : खेळाच्या माध्यमातून आध्यात्मिक गुणांचा प्रसार (Spreading spiritual qualities through sports) व्हावा या उद्देशाने संत निरंकारी (Sant Nirankari) मिशनच्या वतीने निरंकारी सेवादलाच्या माध्यमातून रविवारी बदलापूर येथील घोरपडे मैदानात एक्त्वासाठी क्रिकेट (Cricket for field unity) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली क्षेत्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या खेळामध्ये 'एकत्वासाठी क्रिकेट' स्पर्धेत अंतिम सामन्यात द्वारलीपाडा हा संघ विजयी ठरला तर सोनारपाडा हा संघ उपविजेता ठरला.
मॅन ऑफ दी सीरीज (Man of the series) हा किताब द्वारीपाडा संघाच्या तन्मय पाटील, सर्वोत्तम फलंदाज बदलापूर संघाचा रोहित जगताप, सर्वोत्तम गोलंदाज द्वारलीपाडा संघातील हरेश गायकर, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण सोनारपाडा संघातील धीरज उपाध्याय या खेळाडूला देण्यात आला. तर शिस्तबद्ध संघ म्हणून कल्याण संघाला पारितोषिक देण्यात आले. प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित असलेले संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांनी विजयी संघास आकर्षक चषक देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी उपविजेता, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरिल संघाला तसेच उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत डोंबिवली क्षेत्रांतर्ग डोंबिवली, गोग्रासवाडी, कल्याण, उल्हासनगर, विट्ठलवाडी, सोनारपाड़ा, द्वारलीपाडा, अंबरनाथ, बदलापुर, भिसोळ, शहापुर, ठाकुर्ली भिवंडी, टिटवाळा आदी संघांचा सहभाग होता. निकोप स्पर्धेद्वारे अध्यात्मिकतेचा आधार घेत तना मनाचा विकास साधणे आणि प्रेम नम्रता सहनशीलता या दैवी गुणांचा विकास करत मैत्रीपूर्ण संबंध वाढविणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतु होता.
सकाळी क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे आणि क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे यांनी फलंदाजी व गोलंदाजी करुन या स्पर्धेचे विधिवत उद्घाटन केले.
या स्पर्धेच्या दरम्यान माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे, माजी नगराध्यक्ष शरद तेली, कॅप्टन आशिष दामले, नगरसेवक आकाश साप्ते आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देत निरंकारी मिशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये बदलापूर ब्रांच मुखी माधवराव पोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांसह आसपासच्या परिसरातील निरंकारी भाविकांचे सहकार्य लाभलं. दरम्यान स्पर्धेच्या वेळी डोंबिवली झोन मधील मंडळाचे अनेक मुखी, प्रबंधक आणि सेवादल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
Editorial

Editorial

Next Story