Corona patients
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात (State) कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य विभागाने (Health department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ७८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५८७ इतकी झाली आहे. आज राज्यात ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त (Corona free) झालेल्यांची संख्या ७९,९६,८८३ इतकी झाली आहे.
राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या (Corona patients) संख्यत वाढ (Increase) होत आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४५८७ इतकी आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार ४३४ इतरी आहे. त्यानंतर ठाण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ८२० इतकी आहे. तर रायगडमध्ये २५१ सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ७४७ इतकी आहे. परभणीमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही,
राज्यातील तो एकमेव जिल्हा आहे. राज्यात आज ७८८ नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात आज मुंबईमध्ये २२१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर पुणे महानगरपालिकामध्ये ६८ नवे रुग्ण आढळले आहेत. चिंचवडमध्ये २९ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यात आज ३८ रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबादमध्ये ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकामध्ये ५९ नवे रुग्ण आढळले आहेत.
वाशिम, बुलढाणा, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, मालेगाव, उल्लासनगर या ठिकाणी आज एकही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही.
गेल्या २४ तासात देशात ५,३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारताच्या समग्र कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये (Vaccination campaign) आतापर्यंत लसीच्या २२० कोटी ६६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (९५.२१ कोटी दुसरी मात्रा आणि २२.८७ कोटी वर्धक मात्रा) गेल्या २४ तासात ६५९ लस मात्रा देण्यात आल्या. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ३२,८१४ इतकी आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे ०.०७ टक्के इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८.७४ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासात ३,७२६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ( महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,४१,९२,८३७ इतकी आहे. देशाचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (३.३९टक्के) इतका आहे. आत्तापर्यंत ९२.२७ कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या असून गेल्या २४ तासात १,५७,८९४ कोविड तपासण्या करण्यात आल्या.
Editorial

Editorial

Next Story