✕
आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली होती
By EditorialPublished on
आज धुळवडीच्या (Holi) दिवशी विरोधकांना माफ केलं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) यांनी केलं. आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग (Cannabis) पाजली होती त्यामुळे कोणी रडत होतं, कुणी गात होतं असंही ते म्हणाले.

x

मुंबई : आज धुळवडीच्या (Holi) दिवशी विरोधकांना माफ केलं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) यांनी केलं. आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग (Cannabis) पाजली होती त्यामुळे कोणी रडत होतं, कुणी गात होतं असंही ते म्हणाले. राज्याचं बजेट (Budget) सर्वसमावेशक असेल, त्यामध्ये सर्व रंग दिसतील असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार नक्कीच उभे राहील असंही ते म्हणाले. मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे, काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात, मात्र एखादा दिवस सोडून ३६४ दिवस सभ्य लोकांसारखे वागावे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे काही मित्र आहेत त्यांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली होती. त्यानंतर कुणी गाणं गात होतं, कुणी रडत होतं. असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा, संगीताची नशा करावी, कामाची नशा करावी. आम्ही विधानसभेमध्ये सांगितलं होतं की या सर्वाचा आम्ही बदला घेणार, आता या होळीच्या दिवशी सर्व विरोधकांना आम्ही माफ केलं, विरोधकांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही, हाच आमचा बदला आहे. आज मुंबईतील वांद्रे येथे धुलिवंदनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील नागरिकांनी धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व नागरिकांना होळीच्या, धुलिवंदनाच्या शुभेच्छा. होळी हे एक असे पर्व आहे ज्यामध्ये होलिका दहनात आपण सर्व वाईट गोष्टीचे दहन करतो आणि नवीन सुरुवात करतो. त्याचप्रमाणे जीवनातील सर्व वाईट गोष्टी मागे टाकून आपण नव्याने सुरुवात केली पाहीजे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा टोला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावल्याचं बोललं जातंय. दरम्यान आम्ही त्यांना माफ केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता संपणार का ? या दोघांच्या दरम्यान संवादाची दारं पुन्हा खुली होणार का याचीही चर्चा आहे.
बजेट सप्तरंगी असेल
देवेंद्र फडणवीस उद्या राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मांडणार आहेत. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, होळीप्रमाणेच अर्थसंकल्पात वेगवेगळे रंग पाहायला मिळतील. हे बजेट सप्तरंगी असेल. सर्व घटकांचा बजेटमध्ये विचार केलेला आहे. राज्याला सर्वसमावेशक अर्थसंकल्प पाहायला मिळेल.

Editorial
Next Story
Related News
X
