Bank
नवी दिल्ली : बँक (Bank) कर्मचायांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांना (Bank employees) आता आठवड्यातुन दोन दिवस सुट्टी (Two days off) लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
बँकांमध्येही सरसकट पाच दिवसांचा आठवडा सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय बँक संघ (IBA) बैंक (Bank) संघटनांच्या मागणीवर विचार करत आहे. बँक युनियन (Bank union) संघटनांनी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांसाठी बँक यूनियन संघटनांनी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा उचलला होता.
वास्तविकांना दुसरा आणि चौथा शनिवार -रविवार सुट्टी असते. ही मागणी मान्य झाल्यानंतर सर्वाधिक फटका ग्राहकांना (Customers) बसणार आहे. कारण शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी
(Sunday bank holiday)
असल्याने बँकांशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी प्रत्येक दिवशी कामाच्या तासात ५० मिनिटांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. बँक कर्मचान्यांना सकाळी ९.४५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करावे लागेल.
भारतीय बँक संघटनेने या मागणीला सैद्धांतिक पद्धतीने सहमती दर्शवली आहे. दरम्यान सरकार आणि रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे. भील इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव एस नागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बँकांमध्ये पाच दिवस कामकाज करण्याचा नियम लागू करायचा असेल तर त्यासाठी सरकारला निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स अॅक्टच्या सेक्शन २५ अंतर्गत एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे लागेल. सध्या बँकांमध्ये कर्मचान्यांना महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते. मार्च महिन्यात दुसन्या चौथ्या शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस बँका बंद राहणार आहे. २०२३ मध्ये होळी, चैत्र नवरात्र, रामनवमी सारखे अनेक सणांचा समावेश आहे.
Editorial

Editorial

Next Story