Jayant Patil
मुंबई : विदर्भात ७ महिन्यात १६ वाघांचा (Tigers) मृत्यू झाला ही नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन अथॉरिटीची (National Tiger Conservation Authority) आकडेवारी असून यामध्ये ९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू तर ४ वाघ वीजेच्या प्रवाहाने आणि काहींची शिकारही झाली आहे त्यामुळे राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली. राज्याला वनमंत्री धाडसी मिळाले आहेत त्यांनी मंत्रालयात वाघाचे पुतळे आणि फोटो लावले आहेत पण फोटो आणि पुतळे लावून काही होणार नाही. ठोस निर्णय घ्या असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
Next Story