Distribution of waste bins on World Zero Waste Day
कल्याण : जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त (World Zero Waste Day) शिवसेना (Shivsena) ठाणकर पाडा विभागीय शाखेत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार (MLA) निधीतून व उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या प्रयत्नाने प्रभागातील विविध सोसायट्यांना कचऱ्याचे डबे (Garbage cans) वाटप करण्यात आले. या कचऱ्याच्या डब्यांमुळे ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करणे सोपे होणार असून कचऱ्याचे वर्गीकरण केल्याने सोसायटीच्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटी मध्ये लावता येणार आहे. यामुळे डम्पिंग ग्राउंडवर (At the dumping ground) साचणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होणार आहे. या प्रसंगी महिला शहर प्रमुख नेत्रा उगले, विभाग संघटक सुनिता मोरे, उपशहर प्रमुख मोहन उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उप विभाग, शाखाप्रमुख नितीन कदम, शरद आव्हाड, धर्मेंद्रसिंग भदोरिया उपशाखाप्रमुख उमेश भुजबळ, समीर पायले, गणेश कुंभारकर, सागर भदोरिया, समीर नागरे समस्त शिवसैनिक, महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.
Editorial

Editorial

Next Story