✕
पीएफचा पैसाही अदानींना... ना तपास, ना उत्तर!
By EditorialPublished on
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला. एलआयसी, एसबीआय व ईपीएफओचे भांडवल अदानी समूहात गुंतवले जात आहे. या प्रकरणी कोणतेही उत्तरदायित्व नाही किंवा तपासही केला जात नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढी भीती का वाटत आहे? असे राहुल म्हणाले.

x

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला. एलआयसी, एसबीआय व ईपीएफओचे भांडवल अदानी समूहात गुंतवले जात आहे. या प्रकरणी कोणतेही उत्तरदायित्व नाही किंवा तपासही केला जात नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढी भीती का वाटत आहे? असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात (English newspaper) प्रकाशित बातमीचा दाखला देत केंद्रावर हल्ला चढवला. या वृत्तात ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांचे कष्टाचे पैसे अदानींच्या २ शेअर्सचे 'कॅप्टिव्ह गुंतवणूकदार' (Captive investors) असल्याचा दावा करण्यात आला आहे. जनतेच्या रिटायरमेंटच्या पैशांची अदानींच्या कंपन्यात का गुंतवणूक केली जात आहे? पंतप्रधानजी ना तपास, ना उत्तर. अखेरीस एवढी भीती कशाची वाटत आहे?
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ईपीएफओची बहुतांश गुंतवणूक निफ्टी ५० शेअर्समध्ये केली जाते. त्यात अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) व अदानी पोर्ट्स (Adani Ports) अँड एसईझेडचा समावेश आहे.
हिंडेनबर्गचा (Hindenburg) अहवाल आल्यानंतर अदानींचे हे दोन्ही शेअर्स कोसळलेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी व काँग्रेस नेते सातत्याने केंद्र व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधीनी यांनी परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्योगपती गौतम अदानींशी साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. अदानींच्या शेल कंपन्यांत २० हजार कोटींची गुंतवणूक कुणाची आहे? असा सवालही केला आहे.

Editorial
Next Story
Related News
X
