✕
आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान
By EditorialPublished on
राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' ('Maharashtra Bhushan') पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणान्या पदाविभूषण आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis),
_202303251622170860.jpg)
x
मुंबई : राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' ('Maharashtra Bhushan') पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणान्या पदाविभूषण आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), विधानसभा (Assembly) अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Bharat Ratna Sachin Tendulkar), मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशा ताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण अनेकवेळा व्हर्सेटाईल शब्द वापरतो. त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशाताई आहेत. त्यांनी गायलेली गाणी खूप अवीट आहे. भक्तीगीत ते पॉप, रॉक पर्यंत सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांनी त्यांचे वैशिष्ट्य सातत्यानं जपले आहे. वीस भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत. हजारो गाणी त्यांनी गायली आहेत. त्या प्रत्येक गाण्यात त्यांनी वेगळेपण जपले आहेत. शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले (Asha Bhosle) होत नाही. मंगेशकर (Mangeshkar) कुटूंबियांनी जी संगीताची सेवा केली ती अविस्मरणीय आहे. कुठलाही पुरस्कार त्या सेवेपुढे छोटाच आहे. आपलेपण पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. असेही फडणवीस म्हणाले. आताच्या तरुण पिढीच्या आयकॉनिक गायिका म्हणूनही त्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी आवाजातील विविधता जपली आहे. आशा ताईंच्या गाण्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी श्रोत्यांना खूप स्वरानंद दिला. एकाच दिवशी सात गाणी गाण्याचा विक्रम आशा भोसले यांचे नाव घेता येईल. या शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
