Mumbai Metro
मुंबई : महामुंबई मेट्रो (Mumbai Metro) संचलन महामंडळाने 'मुंबई १' कार्डचा (Card) वापर करून मुंबई मेट्रोने प्रवास (Journey) करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० दिवसांच्या कालावधीत ४५ वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १५ टक्के सुट तर ६० वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २० टक्के सूट मिळणार आहे. सदर सवलतीची वैधता (Validity of discount) ही ३० दिवसांच्या कालावधीसाठी मर्यादित असून त्याचा शुल्क मुंबई १ कार्डच्या माध्यमातून प्रीपेड स्वरूपात आकारला जाईल.
त्यासोबतच मुंबई मेट्रो च्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणी भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी 'अमर्याद ट्रीप पास'
(Infinite Trip Pass)
ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार एक दिवसीय अमर्याद ट्रीप (Trip) पासचे शुल्क (Pass fee) हे रुपये ८०, तर ३ दिवसांच्या अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये २०० इतके असेल.
मुंबई मेट्रोचे प्रवासी त्यांचे 'मुंबई १' हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काऊंटर (Counter) आणि कस्टमर केअर काउंटरवर (Customer care counter) अल्प कागदपत्रांसह सहज मिळवू तसेच रिचार्ज करू शकतात. या कार्डचा वापर रिटेल स्टोअरमध्ये आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते.
मुंबईकर मेट्रो प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त असणाऱ्या या सुविधांची घोषणा करताना एमएमआरडीए
(MMRDA)
चे मा. महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास, भा.प्र.से., म्हणाले, 'मुंबई मेट्रो या पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढून प्रदूषण (Pollution) कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मुंबईकरांचा दैनंदीन मेट्रो प्रवास हा अधिकाधिक सुखकर व्हावा या हेतूने आम्ही सातत्याने नवनवीन पर्यायांचा विचार आणि अमलबजावणी करीत आहोत. मुंबई - १ कार्डच्या माध्यमातून सध्या सोमवार ते शनिवार ५ टक्के, रविवारी आणि राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी १० टक्के सवलत उपलब्ध आहे. मुंबई मेट्रो (Mumbai Metro) प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या नवीन ट्रीप पास योजनेमुळे तिकीट प्रक्रिया ही अधिक सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.
त्यासोबतच या योजनेमुळे मुंबई मेट्रो प्रवासादरम्यान जास्तीतजास्त प्रवाशांना मुंबई - १ हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.'

Editorial

Editorial

Next Story