✕
मुंबईला सरकारकडून लुटण्याचा प्रयत्न
By EditorialPublished on
मुंबईतील (Mumbai) दळणवळण, वाहतुकीसारखे गंभीर प्रश्न सोडवण्यास सरकार कमी पडतेय असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केला. २६० अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना ते बोलत होते. मुंबई खऱ्या अर्थाने सोने की चिडीया असून तिला लुटण्याचे काम राज्य सरकार (State government) करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला.
_202303241751216284.jpg)
x
_202303241751216284.jpg)
मुंबई : मुंबईतील (Mumbai) दळणवळण, वाहतुकीसारखे गंभीर प्रश्न सोडवण्यास सरकार कमी पडतेय असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज सभागृहात केला. २६० अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना ते बोलत होते. मुंबई खऱ्या अर्थाने सोने की चिडीया असून तिला लुटण्याचे काम राज्य सरकार (State government) करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला.
मुंबईचा स्वाभिमान जपायचा असेल तर मुंबईच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. कंत्राटदारांना पोसण्याचे कार्य बाजूला ठेऊन मूलभूत प्रश्न सोडवण्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठी जनतेचा स्वाभिमान जागरूक ठेवला पाहिजे, कोळी वाडयांचे सीमांकन निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानग्या घेतल्या पाहिजे. जनतेच्या हक्काच्या (Rights of the people) पैशातून क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅन पुढे नेण्याची आवश्यकता आहे. अशा सूचना दानवे यांनी यावेळी सरकारला केल्या. मालाडमध्ये सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडले, यामुळे सर्वसामान्यांची घरे रस्त्यावर येत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी वर्तवली.
मुंबईतील अनेक कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जातोय, वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबई बाहेर गेल्यास मुंबईवर अन्याय होईल असे दानवे यांनी म्हटले. रस्ते कामं, फर्निचर, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आदी कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईतील स्ट्रीट फर्निचर, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आदींवर कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदारांना पोसण्याचं काम सुरू आहे. जुनी काम नव्याने करून स्वत:ची पाठ थोपटण्याचा काम सरकार करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारने विविध कामात कंत्राटदारांचा फायदा केल्याप्रकरणी सरकारला धारेवर धरले.

Editorial
Next Story
Related News
X
