Modi

नवी दिल्ली : मंगळवारी भारतात कोरोनाचे (Corona) ११३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू (Death) झाला. ६६२ रुग्ण बरे झाले. त्याच वेळी सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ वर पोहोचली आहे. यापूर्वी १९ मार्चला १ हजार ०७१ रुग्णसंख्या (Patient Number) नोंदवली गेली होती, तर मंगळवारी ६९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
दुसरीकडे, देशात आतापर्यंत कोविड (COVID) लसीचे २२०.६५ कोटी डोस देण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी २०२० रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून देशात ४.४६ कोटींहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. ५ लाखांहून अधिक संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. कोविड रुग्णांमध्ये अचानक वाढ होण्याबरोबरच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत १० हून अधिक मृत्यू झाले आहेत.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २८० रुग्ण आढळले. १ रुग्णाचा मृत्यू झाला. १४८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुजरामध्ये १७६ रुग्ण आढळले. १ रुग्णाचा मृत्यू झाला. ९१६ वर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये ११३ रुग्ण आढळले. १ मृत्यू झाला. १०२५ वर उपचार सुरू आहेत. तर कर्नाटकात ६२४ रुग्ण उपचार घेत आहेत.
मोदींनी (Modi) घेतला आरोग्य यंत्रणांचा आढावा
देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी कोरोनाची सद्यस्थीती आणि याबाबत उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणांची कितपत तयारी आहे याचा आढावा घेतला.

Editorial

Editorial

Next Story