Municipal Corporation's security team will make it more efficient: Dr. Sanjeev Kumar
मुंबई : महानगरपालिकेचे (Municipal Corporation) कार्यक्षेत्र कुलाब्यापासून तानसा वैतरणा तलावापर्यंत व्यापलेले आहे. या कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांचे जतन व संरक्षण करण्याची महत्वपूर्ण काम महानगरपालिका (Municipal Corporation) सुरक्षा दलातील (Security guard) अधिकारी व कर्मचारी करित असतात. या सुरक्षा दलाचे अत्याधुनिकीकरण (Modernization) करणे, सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासह भरती प्रक्रिया राबविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सकारात्मक प्रयत्न करित आहे. यामुळे महानगरपालिकेचे सुरक्षा दल हे अधिक सक्षम व सामर्थ्यशाली होण्यास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या ५७ व्या वर्धापनदिनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. बृहन्मुंबई महानरगपालिकेच्या सुरक्षा दलाला ५७ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण सभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार
(Dr. Sanjay Kumar)
यांच्या हस्ते आज रोजी भांडुप (पश्चिम) परिसरातील खिंडीपाडा मार्गावर असणाऱ्या सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्र.) अजित तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमादरम्यान प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी आपल्या भाषणा दरम्यान सुरक्षा दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलास महाराष्ट्र राज्याच्या पथसंचलनामध्ये द्वितीय पारितोषिक मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करित त्यांनी सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची माहिती दिली. तसेच सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी हे आपली कर्तव्ये सांभाळून विविध क्रीडा व कला क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करित असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध स्तरावरील पारितोषिक पटकावल्याबदल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या चमुचे समीर माने, कबड्डी स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान मनोज चौगुले, रस्सीखेच स्पर्धेतील विजेता लक्ष्मण गोळे, व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान हरिश्चंद्र पाटील यांचा समावेश होता.
आजच्या वर्धापनदिनी झालेल्या आयोजित संचलनामध्ये सुरक्षा दल प्लाटून क्रमांक ३ च्या संचलनास सर्वोत्कृष्ट संचलनाचे पारितोषिक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. प्लाटून क्रमांक 3 चे कप्तान शेखर उधराज यांनी त्यांच्या प्लाटूनच्या वतीने सर्वोत्कृष्ट संचलनाचा मानाचा चषक स्वीकारला. तर लवकरच निवृत्त होणारे सहाय्यक सुरक्षा अधिकारी संदीप पाटील यांचा कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात आला.

Editorial

Editorial

Next Story