Team India created the biggest record
नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : बॉर्डर-गावसकर करंडक २०२३ (Border-Gavaskar Karandak 2023) स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) संघात अहमदाबादच्या (Ahmedabad) मैदानावर पार पाडला. हा चौथा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत २-१ असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) घरच्या मैदानावर सलग १६ वी मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम एक विक्रम केला. भारताने (India) सलग चौथी बॉर्डर-गावसकर करंडक जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने मालिका जिंकली
टीम इंडियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. टीम इंडियाने पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलग पराभव केला. मात्र तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादमध्ये खेळली गेलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली. अशा प्रकारे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून सलग चौथी मालिका जिंकली.
Editorial

Editorial

Next Story