✕
देशाचा अपमान सहन करणार नाही
By EditorialPublished on
विदेशात जाऊन आपल्या देशावरच (On the country) टीका करणे चुकीचे आहे. भारताकडे जी-२० (G-20) चे अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे.

x
नवी दिल्ली : विदेशात जाऊन आपल्या देशावरच (On the country) टीका करणे चुकीचे आहे. भारताकडे जी-२० (G-20) चे अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे. अशावेळी भारतातील एक खासदार विदेशात (Abroad) जाऊन भारताबद्दल बोलत असेल, अपमान करीत असेल तर, ते कदापि सहन केले जाणार नाही, या शब्दांत उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांनी काँग्रेसचे खासदार (Congress MP) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव घेता त्यांना फटकारले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपराष्ट्रपतींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला. भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदाराने विदेशात जाऊन म्हणणे हा देशाचा अपमान आहे. सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय आनंदित आहेत.
आपण अशा काळात असताना एक खासदार विदेशात जाऊन देशाच्या विरोधात बोलतो, हे दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचे हे हनन आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती तसेच ते विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत, असा आरोप केला होता.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपानेही जोरदार हल्लाबोल केला होता. त्यातच उपराष्ट्रपतींनीही राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
