✕
हसन मुश्रीफांना हैराण करणाऱ्या किरीट सोमय्यांना झटका !
By EditorialPublished on
ईडीच्या (ED) छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाने (High court) मोठा दिलासा दिला आहे. २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना (Police) मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफायआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
_202303111745033127.jpg)
x
_202303111745033127.jpg)
मुंबई : ईडीच्या (ED) छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाने (High court) मोठा दिलासा दिला आहे. २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना (Police) मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफायआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगड़ा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एायआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Next Story
Related News
X

