'Panchamrit' of budget development and prosperity - no. Vikhe Patil

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Cm Devendra Fadnavis) यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्याला संमृध्दीच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. राज्यात प्रथमच गो-सेवा आयोगाची ऐतिहासिक घोषणा आणि नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
महसूल विभागासाठी ४३४ कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोतवाल पदाच्या मानधनात वाढ करून सरसकट रुपये १५ हजार करण्यात आले आहेत. यासोबतच बांधकाम परवानगी घेते वेळी अकृषीक वापराची सनद मिळणार नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तर रोव्हर तंत्रज्ञानाद्वारे करून जमिनीची नोंदणी ९० दिवसात पूर्ण होणार असल्याने महसूल विभागासाठी अतिशय महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पशुसंवर्ध विभागाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी या अतिशय समाधानकारक असून, देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षणासाठी महाराष्ट्र गो-सेवा आयोगाची स्थापना ही ऐतिहासीक बाब म्हणावी लागेल.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात आली. रोजगार निर्मितीला प्राधान्य आणि पर्यावरण पुरक विकास साध्य करताना भांडवली गुंतवणूकीतून पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले गेले असल्याने राज्याच्या विकासाचे एक व्हिजन मांडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

Editorial

Editorial

Next Story