Voting is over
पुणे, दि. २६ (वार्ताहर) : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला (Polling for Kasba Peth and Chinchwad Assembly by-election) सकाळी सुरुवात झाली. मतदारांनी सकाळी सकाळी मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदान प्रक्रियेत भाग घेतला, सायंकाळी पाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. कसब्यात ४५.२५ टक्के मतदान तर चिंचवडमध्ये ४१.१ टक्के मतदारांनी बजावला हक्क बजावला. ही आकडेवारी सायंकाळी पाचपर्यंतची आहे. २ मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केले. आजारी असताना सुद्धा बापट यांनी मतदानाला हजेरी लावली. अहिल्यादेवी शाळेत पोहचून बापट यांनी मतदान केले. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वत: मैदानात उतरून पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. चिंचवडमध्ये मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक आपापसांत भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला. यावरुन गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर भाजपचे नाव आणि चिन्ह असलेला शेला परिधान करून हेमंत रासने यांनी मतदान केले. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून रासने यांच्या कृतीवर आक्षेप घेत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कसब्यात टिळक परिवाराने मतदानाचा हक्क बजावला. कन्या शाळेतील मतदान केंद्रावर शैलेश टिळक, चैत्राली टिळक आणि कुणाल टिळक यांनी मतदान केले. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.
Editorial

Editorial

Next Story